Friday, 23 February 2018

राजीयांचा गड राजगड

                                          किल्ले राजगड


गडाचे बांधकाम :-

तोरणा या किल्ल्याचे बांधकाम सुरू असताना सापडलेल्या धनाच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुदा  सन १६४५ मधे या मुरंबदेव या डोंगराचे रूपांतर राजगडसारख्या भक्कम किल्ल्यामधे रूपांतर केले .

गडाचा इतिहास  :-

छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या वयाच्या १४ व्या वर्षी तोरणा या किल्ल्या बरोबरच राजगड हा किल्ला बांधला . राजगड किल्ला हा तसा इसविसनाच्या पहिल्या शतकातील किल्ला आहे. सर्वप्रथम डोंगराला किल्ल्याचे स्वरूप गौतमिपुत्र सातकर्णी याने दिले. राजगड हे  शिवाजी महाराजांचे पहिले केंद्रबिंदू ,तसेच स्वराज्याची पहिले राजधानी सुद्धा राजगडच .

सुमारे १४९० मधे निजामशाहीचा संस्थापक "अहमद बहिरी" याने हा किल्ला हस्तगत केला .किल्ल्यावर जो पर्यंत निजामशाही होती तो पर्यंत सुमारे १२५ वर्ष या किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही .निजामशाहीनंतर हा किल्ला आदिलशाहीकडे आला .निजामशाहीच्या काळात किल्ल्याची व्यवस्था पाहण्याचे काम "बाजी हैबतराव शिळीमकर" व त्यांचे वडील "रुद्राजी नाईक" यांच्या कडे होते .पुढे आदिलशाहाचा वजीर "मलिक अंबर" याच्या आदेशानुसार किल्ल्याचा ताबा हैबतखानाकडे देण्यात आला .

छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहुन जेव्हा ( १२ सप्टेंबर १६६६ ) सुखरूप निसटून आले ते प्रथम राजगडावर . २४ फेब्रुवारी १६७० ल राजाराम महाराज यांचा जन्म राजगडावर झाला .सन १६७२ ल शिवाजी महाराज यांनी आपला मुक्काम रायगडावर नेला .औरंगजेबाने १७ फेब्रुवारी १७०४ ला स्वतः जातीने हा किल्ला जिंकून घेतला .

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :-

१ : सुवेळा माची .

२ : पद्मावती तलाव .

३ : राजवाडा .

४ : गुंजवणे दरवाजा .

५ : पद्मावती मंदिर .

६ : संजीवनी माची .

७ : काळेश्वरी बुरूज .

८ : बालेकिल्ला .


गडावर जाण्याची व्यवस्था :-

कर्जत ,पाली ,पुणे , गुंजवणे येथून एसटी महामंडळाच्या एसटी गाड्या अथवा खासगी वाहन . 

गडावर जाण्याचे मार्ग :-

१ : गुप्त दरवाज्याने . 
२ : पाली दरवाज्याने .
३ : गुंजवणे दरवाज्याने .
४ : आळू दरवाज्याने .  

Tuesday, 20 February 2018

किल्ले शिवनेरी

किल्ले शिवनेरी 

  

बांधकाम :-
इसवी सन ११व्या किंवा १२व्या शतकात "राष्ट्रकूट" अथवा "यादव" यांच्या कारकिर्दीत बांधला गेला                असावा. 

ऊंची :-
समुद्रसपाटीपासून ३३४२ फूट.

किल्ल्याचा इतिहास :-

१९  फेब्रुवारी १६३० रोजी जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झाला .महाराष्ट्राचे भाग्यविधाते ठरलेल्या शिवरायांचे वास्तव्य बालपणी शिवनेरीवर होते .निजामशाहीनंतर शिवनेरी मोगलांच्या ताब्यात गेला.येथील स्थानिक कोळ्यांनी स्वतंत्र होण्यासाठी १९६० साली बंड केला तो मोगलांनी मोडून काढला आणि कोळ्यांना पकडून शिवनेरीवरील टेकडीवर म्हणजेच कोळी चबुतरा अथवा काळा चबुतरा येथे शिरच्छेद केला. या घटनेमुळेच या टेकडीला कोळी चबुतरा किंवा काळा चबुतरा असे म्हटले जाऊ लागले .
                                          
 शिवनेरीजवळ चावंड ,हडसर ,जिवधन,हरिश्चंद्र इत्यादी गड व त्यांच्या खालील प्रदेशाचा एक नवीन तालुका तयार करण्यात आला व त्या तालुक्याचे पहिले सुभेदार म्हणून "उद्धव विरेश्वर चितळे" यांना नेमण्यात आले. 
                                          
पेशवाईमध्ये नारायणरावांच्या गारद्यांनी केलेल्या हत्येमुळे रघुनाथराव उर्फ राघोबादादा यांना सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हेतूने त्यांचे दोन्ही पुत्र "दुसरे बाजीराव" आणि "चिमाची आप्पा दुसरे" यांना बारभाईंनी जुन्नरमध्ये २ वर्ष कैदेत ठेवले होते .या २ वर्षांच्या कैदेत असताना दुसर्‍या बाजीराव पेशव्यांनी गडदेवता शिवाई देवीला बहीण मानून भाऊबीजेला साडी-चोळी पाठविली. इंग्रज आणि पेशव्यांच्या युद्धात १८१८ साली इंग्रजांनी दोनच दिवसात शिवनेरी जिंकला.
                                        
शिवनेरीहून लेण्याद्रीची डोंगररांग दिसते, तसेच जुन्नर-नाणेघाट हा सातवाहनकालीन व्यापाराचा मार्ग होता आणि या मार्गाच्या संरक्षणासाठी चावंड,हडसर,जीवधन,शिवनेरी या किल्ल्यांची निर्मिती झाली.

किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे :-





१ - शिवजन्मस्थान . 

२ - शिवाई मंदीर . 

३ - गंगा - यमुना पाण्याच्या टाक्या . 



  
४ - बदामी तलाव . 


५ - महाराष्ट्र राज्य शासनाने बांधलेली शिवकुंज इमारत .



(शिवकुंजातील राजमाता जिजाऊमांसाहेब व बालशिवरायांची पंचधातूची मूर्ति ) 


६ - शिवनेरी किल्ल्याला असणारे सात दरवाजे .

१ ) महादरवाजा :-


२) परवानगीचा दरवाजा :-

३ ) हत्ती दरवाजा :-

   ४ ) पीर दरवाजा :-

५ ) शिपाई दरवाजा :-


६ ) फाटक दरवाजा :-


७ ) कुलापकर दरवाजा :-

७ - अंबारखाना . 



८ - कमानी मशीद . 

९ - इदगाह व नमाजाची जागा .


कसे जाल ?

शिवनेरी जुन्नरहून  २ किलोमीटर अंतरावर आहे. शिवनेरीवर जाण्यासाठी दोन                                                  मार्ग आहेत एक राजमार्ग व दूसरा साखळीची वाट.