किल्ले तोरणा ( प्रचंडगड )
गडाची ऊंची :- समुद्रसपाटीपासून ४६०६ फूट .
प्रकार :- गिरीदुर्ग .
जिल्हा :- पुणे .
गडाची थोडक्यात माहिती :-
पुण्याच्या नैऋत्येस ६४ किलोमीटरवर "कानद" खोर्यात हा किल्ला आहे. डोंगरी किल्ल्यात तोरणा मोठा बाका .
या किल्ल्यावर दोन माच्या आहेत , एक " झुंजार माची " व दुसरी "बुधला माची ". माची म्हणजे किल्ल्याच्या चढनीवर नैसर्गिकरीत्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी. किल्ल्यावर "तोरणजाई" देवीचे देऊळ आहे. त्यावरून किल्ल्यास "तोरणा " असे नाव पडले.
गडाचा इतिहास :-
तोरणा किल्ला हा आदिलशहाकडे होता , पण त्याचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते. किल्ल्यावर आवश्यक पहारेकरी नव्हते , दारूगोळा नव्हता. शिवरायांना हेच हवे होते आणि बरोबर हेच शिवरायांनी हेरले. शिवरायांनी निश्चय केला की तोरणा जिंकूनच स्वराज्याचे तोरण बांधायचे.
निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय कानद खोर्यात उतरले. सर्व मावळ्यांसह शिवराय सिंहाच्या छातीने व हरणाच्या वेगाने झपझप तोरणा चदून गेले. मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या. शिवरायांचे सवंगडी असलेल्या तानाजी मालुसरे यांनी दरवाज्यावर मराठ्यांचे निशाण फडकविले व येसजी कंक यांनी चौकी पहारे बसविले. किल्ला ताब्यात आला. सर्वांनी शिवरायांचा जयजयकार केला. जेव्हा तोरणा शिवरायांनी घेतला तेव्हा ते फक्त १६ वर्षाचे होते. गड ताब्यात घेतल्यानंतर राजांनी तोरण्याच मूळ नाव बदलून त्याच्या आकाराला साजेस " प्रचंडगड " हे नाव ठेवले.
किल्ल्याची दुरूस्ती सुरू असताना एके ठिकाणी मोहरांनी गच्च भरलेल्या चार घागरी सापडल्या. या धनातूनच मिळालेल्या मोहरा या किल्ल्याच्या दुरिस्तिसाठी रजनी खर्च केल्या. हे धन ज्या ठिकाणी सापडले त्याच जागी शिवरायांनी श्री तोरणजाईचे छोटेखानी मंदिर बांधले. तोरणा गडावरुन गुंजण, कानद व वेलवंड या खोर्यांवर अधिकार चालविण्यात येत असे .
औरंगजेबाने पुढे वयाच्या ८९ व्या वर्षी हा किल्ला जिंकला व याचे नाव ठेवले "फतह-उल गैब" म्हणजे दैवी विजय. औरगजेबने लढाई करून जिंकलेला हा एकमेव किल्ला, कारण हा किल्ला जिंकताना तडजोडीची बोलणी किंवा देवाणघेवाण यापैकी कोणत्याही गोष्टी घडल्या नाहीत. पुढे १८०७ मध्ये " सरनौबत नागोजी कोकाटे " यांनी अत्यंत धाडसाने तोरणा परत स्वराज्यात सामील केला.
तोरणा किल्ल्याचे वर्णन करताना जेम्स डग्लस या इंग्रजाने म्हटले आहे की ' सिंहगडास जर सिंहाची गुफा म्हटले टीआर तोरण्यास गरुडचे घरटे म्हटले पाहिजे '.
गडावरील ठिकाणे :-
मजबूत बांधणीचा बिनी दरवाजा
झुंजार माची
तोरणजाई मंदिर
दक्षिणेकडील सफेलीचा बुरूज
फुटक्या बुरूज
दक्षिणेकडील तोरनेश्वर महादेव मंदिर
टकमक बुरूज
मेंगाई टके
मेंगाई मंदिर
भेल बुरूज
हनुमान बुरुज
किल्ल्यास जाण्यासाठीचा मार्ग :-
तोरण्यास जाण्यासाठी पुण्याला जाणारी एस.टी . पकडून शिरवळच्या पुढे लागणार्या नसरापूर फाट्यावर उतरून वेल्हा गावाकडे जाणार्या एस.टी.ने वेल्हा गावात पायउतार व्हायच. वेल्हा गावातून किल्ल्याकडे जाणार्या पायवाटेने चालू लागायच.
No comments:
Post a Comment