Saturday, 7 July 2018

अजिंक्यतारा :- मराठ्यांची चौथी राजधानी

किल्ले अजिंक्यतारा 




गडाची ऊंची :- ३०० मीटर .

प्रकार :- गिरीदुर्ग .

जिल्हा :- सातारा .

डोंगररांग :- सातारा , बामणोली .

गडाचा इतिहास :-

"अजिंक्यतारा" मराठ्यांची चौथी राजधानी. राजगड, रायगड, जिंजी व त्यानंतर अजिंक्यतारा. अजिंक्यतारा हा किल्ला "शिलाहार" वंशातील "भोजराजा दुसरा" याने इ. स. ११९० मधे सातारा येथे बांधला. शिलहरांनातर हा किल्ला "बहमनी" सत्तेकडे गेला व त्यानंतर विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. "श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या स्वराज्याचा विस्तार होत असताना २७ जुलै १६७३ रोजी अजिंक्यतारा हा महाराजांच्या हाती आला. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या मृत्यूनंतर इ. स. १६८२ मध्ये औरगजेब जेव्हा महाराष्ट्रात घुसला तेव्हा त्याने या सातारच्या अजिंक्यतार्‍याला वेढा दिला इ. स. १६९९ मध्ये. तेव्हा अजिंक्यतार्‍याचे किल्लेदार "प्रयागजी प्रभू" हे होते. मुघलांनी वेढा देत असताना गडाला सुरुंग लावण्याचा बेत आखला होता, त्यानुसार मुघलांनी १३ एप्रिल १७०० रोजी पहाटे सुरुंग लावण्यासाठी भुयारे खणली आणि बत्ती देताच किल्ल्यावरील मंगळाईचा बुरूज आकाशात भिरकवला गेला. त्या क्षणी तटावर असणारे काही मराठे दगावले तेवढ्यातच दुसर्‍या सुरुंगाचा स्फोट झाला मुघल सैन्य किल्ला जिंकण्याच्या आवेशाने पुढे घुसले व मोठा तट मुघलांवर कोसळला व १५०० मुघल सैन्य मारले गेले. किल्ल्यावरील सर्व रसद व दारूगोळा संपला होता शेवटी एप्रिल २१ रोजी सुभानजीने किल्ला जिंकून घेतला. मुघलांना अजिंक्यतार्‍यावर मुघली निशाण फडकविण्यास तब्बल साडेचार महीने लागले. मुघलांनी किल्ला जिंकल्यानंतर त्याचे "आझामतारा" असे नामांतर केले. त्यानंतर "महाराणी ताराबाई" यांच्या सैन्याने किल्ला जिंकला व त्याचे नामांतर "अजिंक्यतारा" असे केले. पण त्या नंतर "श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज" याचे नातू व "श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज" याचे पुत्र "श्रीमंत छत्रपती शाहू महाराज" यांनी फितवून अजिंक्यतारा घेतला व स्वतःस "१२ जानेवारी १७०८" रोजी राज्याभिषेख करवून घेतला. मराठा साम्राज्याचा कारभार चालविताना "श्रीमंत छत्रपती शाहू महाराज" यांनी सातारा या शहराची स्थापना केली. पुढे "श्रीमंत छत्रपती शाहू महाराज दुसरे" यांच्या मृत्यूनंतर दि. ११ फेब्रुवारी १८१८ मध्ये अजिंक्यतारा इंग्र्जांकडे गेला.


गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :-

१ - महाद्वार. 



२ - मंगळादेवी.


३ - महादेव मंदिर. 

४ - मंगळादेवी मंदिर. 

५ - गडाच्या उत्तरेला असणारे दोन दरवाजे. 


गडाच्या परिसरातील इतर किल्ले :- 

१ - चंदनवंदन . 

२ - कल्याणगड . 

३ - जरंडा . 

४ - सज्जनगड . 

कसे जाल ? 

सातारा शहरातून अनेक वाटांनी गडावर जाता येते. सातारा एस . टी . स्थानकातून अदालत वाड्यामार्गे जाणार्‍या कोणत्याही बसने अदालत वाड्याजवळ उतरून किल्ल्यावर जाता येते. गडापर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता असल्याने गाडीने सुद्धा जाता येते. तसेच सातारा - राजवाडा अश्या १० -१५ मिनिटांनी बससेवा उपलब्ध आहे. 



 

No comments:

Post a Comment