किल्ले प्रतापगड
समुद्रासपाटीपासून गडाची ऊंची :- ३५४३ फूट
प्रकार :- गिरीदुर्ग
जिल्हा :- सातारा ,महाराष्ट्र
डोंगररांग :- सातारा
गडाचा इतिहास :-
.दि. १५ जानेवारी १६५६ रोजी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेंची जावळी ताब्यात घेतली आणि तेथील भोरप्या डोंगरावर किल्ला बांधण्यासाठी मोरोपंतांना आज्ञा केली . तोच हा अद्वितीय किल्ले प्रतापगड . प्रतापगडाच्या पायथ्याशी कुंभरोशी गाव आहे . जवळच असणार्या पारघाट , रडतोंड्या घाट तसेच पोलादपूर घाटावर नजर रोखून प्रतापगड उभा आहे . श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज व आदिलशाही सरदार अफझलखान यांची ऐतिहासिक भेट याच गडावर झाली होती . तसेच प्रतापगडावर आई भवानीचे मंदीर देखील आहे. व या मदिरातील देवीच्या मूर्तीशेजारीच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे . श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज स्वतःला श्री भवानी देवीचे 'भोपे' म्हणवून घेत . आपले विश्वासू सरदार मंबाजीनाईक पानसरे यांना नेपाळ येथे पाठवून गंडकी नदीतील शिळेपासून बनवलेली श्री भवानी देवीची मूर्ती आणली व इ.स. १६६१ च्या ललितपंचमीच्या मुहूर्तावर किल्ले प्रतापगडावर देवीची प्रतिष्ठापना केली . पुढे राज्याभिषेकाचे अगोदर दि . १९ मे १६७४ ला महाराजांनी देवीला रत्नजडीत सुवर्ण छत्र व दागिने अर्पण केले नंतरच स्वतः छत्रपती झाले . आजही श्रीमंत छत्रपती उदयनरजे भोसले महाराज , सातारा यांचेकडून श्री भवानी देवीची पूजा - अर्चा , उत्सव यथासांग व दिमाखात साजरे केले जातात .
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :-
१ - नगारखाना व दीपमाळ .
२ - श्री आदीशक्ती भवानी मंदिर .
३ - महाद्वार .
४ - यशवंत बुरूज .
५ - दक्खन बुरूज .
६ - रेडका बुरूज .
किल्ले प्रतापगडाच्या परिसरात उगम होणार्या नद्या :-
कृष्णा , कोयना , वेण्णा , सावित्री आणि गायत्री .
कसे जावे ?
प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर येथून किल्ले प्रतापगड फक्त १४ कि.मी, अंतरावर आहे .
महाबळेश्वरवरुन महाडला जाणारी बस पकडून पायथ्याशी कुंबरोशी गावाजवळ उतरून अर्ध्या तासाचा प्रवास करून प्रतापगडास जाता येते .
No comments:
Post a Comment