Wednesday, 27 November 2019

स्वराज्याचे तोरण : किल्ले तोरणा ( प्रचंडगड )

 किल्ले तोरणा ( प्रचंडगड )


गडाची ऊंची :- समुद्रसपाटीपासून ४६०६ फूट .


प्रकार  :- गिरीदुर्ग  .


जिल्हा :- पुणे .


गडाची थोडक्यात  माहिती  :-

पुण्याच्या नैऋत्येस ६४ किलोमीटरवर "कानद" खोर्‍यात हा किल्ला आहे. डोंगरी किल्ल्यात तोरणा मोठा बाका .
या किल्ल्यावर दोन माच्या आहेत , एक " झुंजार माची " व दुसरी "बुधला माची ". माची म्हणजे किल्ल्याच्या चढनीवर नैसर्गिकरीत्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी. किल्ल्यावर "तोरणजाई" देवीचे देऊळ आहे. त्यावरून किल्ल्यास "तोरणा " असे नाव पडले.

गडाचा इतिहास :-

  तोरणा किल्ला हा आदिलशहाकडे होता , पण त्याचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते. किल्ल्यावर आवश्यक पहारेकरी नव्हते , दारूगोळा नव्हता. शिवरायांना हेच हवे होते आणि बरोबर हेच शिवरायांनी हेरले. शिवरायांनी निश्चय केला की तोरणा जिंकूनच स्वराज्याचे तोरण बांधायचे.

  निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय कानद खोर्‍यात उतरले. सर्व मावळ्यांसह शिवराय सिंहाच्या छातीने व हरणाच्या वेगाने झपझप तोरणा चदून गेले. मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या. शिवरायांचे सवंगडी असलेल्या तानाजी मालुसरे यांनी दरवाज्यावर मराठ्यांचे निशाण फडकविले व येसजी कंक यांनी चौकी पहारे बसविले. किल्ला ताब्यात आला. सर्वांनी शिवरायांचा जयजयकार केला. जेव्हा तोरणा शिवरायांनी घेतला  तेव्हा ते फक्त १६ वर्षाचे होते. गड ताब्यात घेतल्यानंतर राजांनी तोरण्याच मूळ नाव बदलून त्याच्या आकाराला साजेस " प्रचंडगड " हे नाव ठेवले.

    किल्ल्याची दुरूस्ती सुरू असताना एके ठिकाणी मोहरांनी गच्च भरलेल्या चार घागरी सापडल्या. या धनातूनच मिळालेल्या मोहरा या किल्ल्याच्या दुरिस्तिसाठी रजनी खर्च केल्या. हे धन ज्या ठिकाणी सापडले त्याच जागी शिवरायांनी श्री तोरणजाईचे छोटेखानी मंदिर बांधले. तोरणा गडावरुन गुंजण, कानद व वेलवंड या खोर्‍यांवर अधिकार चालविण्यात येत असे .

    औरंगजेबाने पुढे वयाच्या ८९ व्या वर्षी हा किल्ला जिंकला व याचे नाव ठेवले "फतह-उल गैब" म्हणजे दैवी विजय. औरगजेबने लढाई करून जिंकलेला हा एकमेव किल्ला, कारण हा किल्ला जिंकताना तडजोडीची बोलणी किंवा देवाणघेवाण यापैकी कोणत्याही गोष्टी घडल्या नाहीत. पुढे १८०७ मध्ये " सरनौबत नागोजी कोकाटे " यांनी अत्यंत धाडसाने तोरणा परत स्वराज्यात सामील केला.

     तोरणा किल्ल्याचे वर्णन करताना जेम्स डग्लस या  इंग्रजाने म्हटले आहे की ' सिंहगडास जर सिंहाची गुफा म्हटले टीआर तोरण्यास गरुडचे घरटे म्हटले पाहिजे '. 
     

गडावरील ठिकाणे  :- 


मजबूत बांधणीचा बिनी दरवाजा   

बुधला माची 


झुंजार माची 

तोरणजाई मंदिर 

दक्षिणेकडील सफेलीचा बुरूज 

फुटक्या बुरूज 

दक्षिणेकडील तोरनेश्वर महादेव मंदिर 

टकमक बुरूज 

मेंगाई टके 

मेंगाई मंदिर 

भेल बुरूज 

हनुमान बुरुज 


किल्ल्यास जाण्यासाठीचा मार्ग  :- 


    तोरण्यास जाण्यासाठी पुण्याला जाणारी एस.टी . पकडून शिरवळच्या पुढे लागणार्‍या नसरापूर फाट्यावर उतरून वेल्हा गावाकडे जाणार्‍या एस.टी.ने वेल्हा गावात पायउतार व्हायच. वेल्हा गावातून किल्ल्याकडे जाणार्‍या पायवाटेने चालू लागायच.    

Saturday, 7 July 2018

अजिंक्यतारा :- मराठ्यांची चौथी राजधानी

किल्ले अजिंक्यतारा 




गडाची ऊंची :- ३०० मीटर .

प्रकार :- गिरीदुर्ग .

जिल्हा :- सातारा .

डोंगररांग :- सातारा , बामणोली .

गडाचा इतिहास :-

"अजिंक्यतारा" मराठ्यांची चौथी राजधानी. राजगड, रायगड, जिंजी व त्यानंतर अजिंक्यतारा. अजिंक्यतारा हा किल्ला "शिलाहार" वंशातील "भोजराजा दुसरा" याने इ. स. ११९० मधे सातारा येथे बांधला. शिलहरांनातर हा किल्ला "बहमनी" सत्तेकडे गेला व त्यानंतर विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. "श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या स्वराज्याचा विस्तार होत असताना २७ जुलै १६७३ रोजी अजिंक्यतारा हा महाराजांच्या हाती आला. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या मृत्यूनंतर इ. स. १६८२ मध्ये औरगजेब जेव्हा महाराष्ट्रात घुसला तेव्हा त्याने या सातारच्या अजिंक्यतार्‍याला वेढा दिला इ. स. १६९९ मध्ये. तेव्हा अजिंक्यतार्‍याचे किल्लेदार "प्रयागजी प्रभू" हे होते. मुघलांनी वेढा देत असताना गडाला सुरुंग लावण्याचा बेत आखला होता, त्यानुसार मुघलांनी १३ एप्रिल १७०० रोजी पहाटे सुरुंग लावण्यासाठी भुयारे खणली आणि बत्ती देताच किल्ल्यावरील मंगळाईचा बुरूज आकाशात भिरकवला गेला. त्या क्षणी तटावर असणारे काही मराठे दगावले तेवढ्यातच दुसर्‍या सुरुंगाचा स्फोट झाला मुघल सैन्य किल्ला जिंकण्याच्या आवेशाने पुढे घुसले व मोठा तट मुघलांवर कोसळला व १५०० मुघल सैन्य मारले गेले. किल्ल्यावरील सर्व रसद व दारूगोळा संपला होता शेवटी एप्रिल २१ रोजी सुभानजीने किल्ला जिंकून घेतला. मुघलांना अजिंक्यतार्‍यावर मुघली निशाण फडकविण्यास तब्बल साडेचार महीने लागले. मुघलांनी किल्ला जिंकल्यानंतर त्याचे "आझामतारा" असे नामांतर केले. त्यानंतर "महाराणी ताराबाई" यांच्या सैन्याने किल्ला जिंकला व त्याचे नामांतर "अजिंक्यतारा" असे केले. पण त्या नंतर "श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज" याचे नातू व "श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज" याचे पुत्र "श्रीमंत छत्रपती शाहू महाराज" यांनी फितवून अजिंक्यतारा घेतला व स्वतःस "१२ जानेवारी १७०८" रोजी राज्याभिषेख करवून घेतला. मराठा साम्राज्याचा कारभार चालविताना "श्रीमंत छत्रपती शाहू महाराज" यांनी सातारा या शहराची स्थापना केली. पुढे "श्रीमंत छत्रपती शाहू महाराज दुसरे" यांच्या मृत्यूनंतर दि. ११ फेब्रुवारी १८१८ मध्ये अजिंक्यतारा इंग्र्जांकडे गेला.


गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :-

१ - महाद्वार. 



२ - मंगळादेवी.


३ - महादेव मंदिर. 

४ - मंगळादेवी मंदिर. 

५ - गडाच्या उत्तरेला असणारे दोन दरवाजे. 


गडाच्या परिसरातील इतर किल्ले :- 

१ - चंदनवंदन . 

२ - कल्याणगड . 

३ - जरंडा . 

४ - सज्जनगड . 

कसे जाल ? 

सातारा शहरातून अनेक वाटांनी गडावर जाता येते. सातारा एस . टी . स्थानकातून अदालत वाड्यामार्गे जाणार्‍या कोणत्याही बसने अदालत वाड्याजवळ उतरून किल्ल्यावर जाता येते. गडापर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता असल्याने गाडीने सुद्धा जाता येते. तसेच सातारा - राजवाडा अश्या १० -१५ मिनिटांनी बससेवा उपलब्ध आहे. 



 

Monday, 2 July 2018

प्रतापगड

किल्ले प्रतापगड 



समुद्रासपाटीपासून गडाची ऊंची :- ३५४३ फूट 

प्रकार :- गिरीदुर्ग 

जिल्हा :- सातारा ,महाराष्ट्र  

डोंगररांग :- सातारा 

गडाचा इतिहास :-

.दि. १५ जानेवारी १६५६ रोजी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेंची जावळी ताब्यात घेतली आणि तेथील भोरप्या डोंगरावर किल्ला बांधण्यासाठी मोरोपंतांना आज्ञा केली . तोच हा अद्वितीय किल्ले प्रतापगड . प्रतापगडाच्या पायथ्याशी कुंभरोशी गाव आहे . जवळच असणार्‍या पारघाट , रडतोंड्या घाट तसेच पोलादपूर घाटावर नजर रोखून प्रतापगड उभा आहे . श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज व आदिलशाही सरदार अफझलखान यांची ऐतिहासिक भेट याच गडावर झाली होती . तसेच प्रतापगडावर आई भवानीचे मंदीर देखील आहे. व या मदिरातील देवीच्या मूर्तीशेजारीच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे . श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज स्वतःला  श्री भवानी देवीचे 'भोपे' म्हणवून घेत . आपले विश्वासू सरदार मंबाजीनाईक पानसरे यांना नेपाळ येथे पाठवून गंडकी नदीतील शिळेपासून बनवलेली श्री भवानी देवीची मूर्ती आणली व इ.स. १६६१ च्या ललितपंचमीच्या मुहूर्तावर किल्ले प्रतापगडावर देवीची प्रतिष्ठापना केली . पुढे राज्याभिषेकाचे अगोदर दि . १९ मे १६७४ ला महाराजांनी देवीला रत्नजडीत सुवर्ण छत्र व दागिने अर्पण केले नंतरच स्वतः छत्रपती झाले . आजही श्रीमंत छत्रपती उदयनरजे भोसले महाराज , सातारा यांचेकडून श्री भवानी देवीची पूजा - अर्चा , उत्सव यथासांग व दिमाखात साजरे केले जातात .     

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :-  

१ - नगारखाना व दीपमाळ .




२ - श्री आदीशक्ती भवानी मंदिर  .


३ - महाद्वार .


४ - यशवंत बुरूज .


५ - दक्खन बुरूज .


६ - रेडका बुरूज .


किल्ले प्रतापगडाच्या परिसरात उगम होणार्‍या नद्या :- 

कृष्णा , कोयना , वेण्णा , सावित्री आणि गायत्री . 

कसे जावे ?

प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर येथून किल्ले प्रतापगड फक्त १४ कि.मी, अंतरावर आहे .
महाबळेश्वरवरुन महाडला जाणारी बस पकडून पायथ्याशी कुंबरोशी गावाजवळ उतरून अर्ध्या तासाचा प्रवास करून प्रतापगडास जाता येते .      


  


Friday, 23 February 2018

राजीयांचा गड राजगड

                                          किल्ले राजगड


गडाचे बांधकाम :-

तोरणा या किल्ल्याचे बांधकाम सुरू असताना सापडलेल्या धनाच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुदा  सन १६४५ मधे या मुरंबदेव या डोंगराचे रूपांतर राजगडसारख्या भक्कम किल्ल्यामधे रूपांतर केले .

गडाचा इतिहास  :-

छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या वयाच्या १४ व्या वर्षी तोरणा या किल्ल्या बरोबरच राजगड हा किल्ला बांधला . राजगड किल्ला हा तसा इसविसनाच्या पहिल्या शतकातील किल्ला आहे. सर्वप्रथम डोंगराला किल्ल्याचे स्वरूप गौतमिपुत्र सातकर्णी याने दिले. राजगड हे  शिवाजी महाराजांचे पहिले केंद्रबिंदू ,तसेच स्वराज्याची पहिले राजधानी सुद्धा राजगडच .

सुमारे १४९० मधे निजामशाहीचा संस्थापक "अहमद बहिरी" याने हा किल्ला हस्तगत केला .किल्ल्यावर जो पर्यंत निजामशाही होती तो पर्यंत सुमारे १२५ वर्ष या किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही .निजामशाहीनंतर हा किल्ला आदिलशाहीकडे आला .निजामशाहीच्या काळात किल्ल्याची व्यवस्था पाहण्याचे काम "बाजी हैबतराव शिळीमकर" व त्यांचे वडील "रुद्राजी नाईक" यांच्या कडे होते .पुढे आदिलशाहाचा वजीर "मलिक अंबर" याच्या आदेशानुसार किल्ल्याचा ताबा हैबतखानाकडे देण्यात आला .

छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहुन जेव्हा ( १२ सप्टेंबर १६६६ ) सुखरूप निसटून आले ते प्रथम राजगडावर . २४ फेब्रुवारी १६७० ल राजाराम महाराज यांचा जन्म राजगडावर झाला .सन १६७२ ल शिवाजी महाराज यांनी आपला मुक्काम रायगडावर नेला .औरंगजेबाने १७ फेब्रुवारी १७०४ ला स्वतः जातीने हा किल्ला जिंकून घेतला .

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :-

१ : सुवेळा माची .

२ : पद्मावती तलाव .

३ : राजवाडा .

४ : गुंजवणे दरवाजा .

५ : पद्मावती मंदिर .

६ : संजीवनी माची .

७ : काळेश्वरी बुरूज .

८ : बालेकिल्ला .


गडावर जाण्याची व्यवस्था :-

कर्जत ,पाली ,पुणे , गुंजवणे येथून एसटी महामंडळाच्या एसटी गाड्या अथवा खासगी वाहन . 

गडावर जाण्याचे मार्ग :-

१ : गुप्त दरवाज्याने . 
२ : पाली दरवाज्याने .
३ : गुंजवणे दरवाज्याने .
४ : आळू दरवाज्याने .  

Tuesday, 20 February 2018

किल्ले शिवनेरी

किल्ले शिवनेरी 

  

बांधकाम :-
इसवी सन ११व्या किंवा १२व्या शतकात "राष्ट्रकूट" अथवा "यादव" यांच्या कारकिर्दीत बांधला गेला                असावा. 

ऊंची :-
समुद्रसपाटीपासून ३३४२ फूट.

किल्ल्याचा इतिहास :-

१९  फेब्रुवारी १६३० रोजी जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झाला .महाराष्ट्राचे भाग्यविधाते ठरलेल्या शिवरायांचे वास्तव्य बालपणी शिवनेरीवर होते .निजामशाहीनंतर शिवनेरी मोगलांच्या ताब्यात गेला.येथील स्थानिक कोळ्यांनी स्वतंत्र होण्यासाठी १९६० साली बंड केला तो मोगलांनी मोडून काढला आणि कोळ्यांना पकडून शिवनेरीवरील टेकडीवर म्हणजेच कोळी चबुतरा अथवा काळा चबुतरा येथे शिरच्छेद केला. या घटनेमुळेच या टेकडीला कोळी चबुतरा किंवा काळा चबुतरा असे म्हटले जाऊ लागले .
                                          
 शिवनेरीजवळ चावंड ,हडसर ,जिवधन,हरिश्चंद्र इत्यादी गड व त्यांच्या खालील प्रदेशाचा एक नवीन तालुका तयार करण्यात आला व त्या तालुक्याचे पहिले सुभेदार म्हणून "उद्धव विरेश्वर चितळे" यांना नेमण्यात आले. 
                                          
पेशवाईमध्ये नारायणरावांच्या गारद्यांनी केलेल्या हत्येमुळे रघुनाथराव उर्फ राघोबादादा यांना सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हेतूने त्यांचे दोन्ही पुत्र "दुसरे बाजीराव" आणि "चिमाची आप्पा दुसरे" यांना बारभाईंनी जुन्नरमध्ये २ वर्ष कैदेत ठेवले होते .या २ वर्षांच्या कैदेत असताना दुसर्‍या बाजीराव पेशव्यांनी गडदेवता शिवाई देवीला बहीण मानून भाऊबीजेला साडी-चोळी पाठविली. इंग्रज आणि पेशव्यांच्या युद्धात १८१८ साली इंग्रजांनी दोनच दिवसात शिवनेरी जिंकला.
                                        
शिवनेरीहून लेण्याद्रीची डोंगररांग दिसते, तसेच जुन्नर-नाणेघाट हा सातवाहनकालीन व्यापाराचा मार्ग होता आणि या मार्गाच्या संरक्षणासाठी चावंड,हडसर,जीवधन,शिवनेरी या किल्ल्यांची निर्मिती झाली.

किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे :-





१ - शिवजन्मस्थान . 

२ - शिवाई मंदीर . 

३ - गंगा - यमुना पाण्याच्या टाक्या . 



  
४ - बदामी तलाव . 


५ - महाराष्ट्र राज्य शासनाने बांधलेली शिवकुंज इमारत .



(शिवकुंजातील राजमाता जिजाऊमांसाहेब व बालशिवरायांची पंचधातूची मूर्ति ) 


६ - शिवनेरी किल्ल्याला असणारे सात दरवाजे .

१ ) महादरवाजा :-


२) परवानगीचा दरवाजा :-

३ ) हत्ती दरवाजा :-

   ४ ) पीर दरवाजा :-

५ ) शिपाई दरवाजा :-


६ ) फाटक दरवाजा :-


७ ) कुलापकर दरवाजा :-

७ - अंबारखाना . 



८ - कमानी मशीद . 

९ - इदगाह व नमाजाची जागा .


कसे जाल ?

शिवनेरी जुन्नरहून  २ किलोमीटर अंतरावर आहे. शिवनेरीवर जाण्यासाठी दोन                                                  मार्ग आहेत एक राजमार्ग व दूसरा साखळीची वाट.